Skip to content Skip to footer

भूकंपग्रस्तांना धीर देण्यासाठी शिवसेना खासदाराने रात्र काढली जागून

भूकंपग्रस्तांना धीर देण्यासाठी शिवसेना खासदाराने रात्र काढली जागून

हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले. याची माहिती मिळताच शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ किनवट आणि माहूर परिसरात धाव घेतली आणि पाहणी केली. एवढंच नव्हे तर पुन्हा रात्री भूकंप होईल या भीतीने घाबरून गेलेल्या लोकांना हेमंत पाटील यांनी धीर दिला. स्वतः रात्रभर जागून खासदार हेमंत पाटील भूकंपग्रस्त भागात फिरले. “घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे” असं म्हणत त्यांनी नागरिकांना भयमुक्त होण्याचे आवाहन केले.

एवढंच नव्हे तर त्यांनी नांदेड आणि हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. खासदार हेमंत पाटील यांच्या व्हाट्स ऍप क्रमांकावरून नागरिकांना भूकंप काळात घ्यावयाची काळजी आणि सूचना पाठवण्यात आल्या. तसेच नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले. अचानक झालेल्या भूकंपानंतर भयभीत झालेल्या नागरिकांना खासदारांच्या या कृतीमुळे चांगलाच दिलासा मिळाला.

यानिमित्ताने नवनिर्वाचित शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या तत्परतेची चुणूक नागरिकांनी पाहिली. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी खासदार धावत आल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले. जनतेकडून हेमंत पाटील यांचे कौतूकही झाले.

मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी बोललोय, बाकीच्यांनी नाक खुपसू नये-उद्धव ठाकरे

Leave a comment

0.0/5