विधानपरिषद उपाध्यक्षपदी नीलम गोऱ्हे बिनविरोध
विधान परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली असल्याने आणि इतर कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. तत्पूर्वी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हवं तर विधान परिषद उपाध्यक्षपद निवडणूक बिनविरोध करा अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला दिली होती. त्यामुळे काँग्रेसने विधानसभा विरोधी पक्षनेतेपद मिळवत विधान परिषद उपाध्यक्षपद निवडणूक अर्ज महेत घेतला. असं असलं तरी युतीच्या संख्याबळानुसार निवडणूक बिनविरोध झाली नसती तरी युटीचाच विजय पक्का होता.
शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ?
गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषद उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असल्याचा बातम्या येत होत्या. त्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचं नाव पक्क झाल्याचंही समोर आलं होतं. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.
डॉ. नीलम गोऱ्हे या २००२ पासून सलग विधानपरिषद आमदार म्हणून ३ वेळा विजयी झाल्या आहेत. तब्बल १७ वर्षे त्या विधानपरिषदेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत आहेत.
शिवसेना प्रवक्त्या म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या गोऱ्हेंनी आमदार म्हणून सुद्धा उत्तम कामगिरी बजावलेली आहे. महिलांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी एक महिला म्हणून सातत्याने आवाज उठवला आहे. विधान परिषद उपाध्यक्षपदी विराजमान आलेल्या नीलम गोऱ्हे या पहिल्या महिला उपाध्यक्षा ठरल्या आहेत.