Skip to content Skip to footer

बेस्टचे भाडे किमान ५ रुपये करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक बाजू अधिक बळकट करण्यासाठी बृहमुंबई महानगर पालिकेने बेस्टला ६०० कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे. आज महापालिकेच्या बेस्ट समितीने किमान भाडे ५ रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे बेस्टचे किमान भाडे पाच रुपये असणार आहे. त्यानुसार, प्रवाशांकडून पहिल्या टप्प्यातील ५ किमी अंतरापर्यंत केवळ ५ रुपये भाडे आकारण्यात येईल. बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर आता महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यानंतर, महापालिकेत मंजुरी मिळताच, ही किमान भाडे आकारणी नव्या दराने लागू होणार आहे.

महापालिका महासभेची बैठक २७ जून रोजी असून बेस्ट भाडेकपातीचा प्रस्ताव मंजुरीसाठी तेथे येईल. महापालिकेत मंजूर झाल्यानंतर आरटीओकडे आणि त्यानंतर नवीन दर अंमलात येतील, असे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ६०० कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला. आज अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला. त्यास, महापालिकेने संमती दिली आहे.

 

बेस्टचा मुंबईकरांना दिलासा ५ किमीसाठी फक्त ५ रुपये…….

सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपए अनुदान देण्यास स्थायी समितीने नुकताच हिरवा कंदिल दाखविला होता. त्यानुसार उर्वरित रक्कमेसाठी महापालिका प्रशासनाच्या अटीनुसार बेस्ट उपक्रम किमान बसभाड्यात कपात करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत मंजुरीसाठी बेस्ट प्रशासनाने मांडला आहे. याप्रमाणे बेस्टचे किमान भाडे आठ रूपयांवरून ५ रुपए होणार आहे. याचा फायदा ६४ टक्के प्रवाशांना होणार आहे

Leave a comment

0.0/5