बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात पनवेलमध्ये ८०० जणांना ऑन द स्पॉट नोकरी
शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यास तरुणांनी प्रतिसाद दिला. यात अनेक कंपन्यांनी आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली. त्यामुळे पनवेल परिसरातील ८०० बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे. या रोजगार मेळाव्यास साडेतीन हजारांहून अधिक तरुणांनी हजेरी लावली. पनवेल जिल्हा शिवसेनेतर्फे पिल्लई कॉलेज येथे हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर रोजगार मेळाव्याचे उदघाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. उद्योग विभाग, महाराष्ट्रवं सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पनवेलमध्ये झालेला हा मेळावा राज्यातील आठवा रोजगार मेळावा ठरला. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या उमेदवार निवडीसाठी आल्या होत्या. तसेच १० वी/१२ वी पास/नापास उमेदवारांपासून ते ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट अशा विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात रोजगार मिळवण्याची संधी होती. मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांपैकी ८०० जणांना जागेवर नियुक्तीतपत्र देण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या या रोजगार मेळावा उपक्रमाअंतर्गत आजवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे.
शिवसेनेने भरून घेतले संभाजीनगर जिल्ह्यातील तब्ब्ल ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे पीक विमा तक्रार अर्ज