Skip to content Skip to footer

शिवसेनेकडून वारकऱ्यांना १५ दिवस मोफत भोजन

शिवसेनेकडून वारकऱ्यांना १५ दिवस मोफत भोजन

ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी नुकतंच पंढरीकडे प्रस्थान केलं आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण विठ्ठलमय होत असून अवघ्या महाराष्ट्राला आषाढी एकादशीची चाहूल लागली आहे. विठ्ठल दर्शनाची आस मनात ठेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. परळीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी परळी शिवसेनेच्या वतीने मोफत भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राजाभैया पांडे यांच्यावतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

उद्या दुपारी दोन वाजता या उपक्रमास सुरुवात होणार असून हा उपक्रम आषाढी एकादशीपर्यंत चालू राहणार आहे. परळी-गंगाखेड रोडवरील पांडे पेट्रोलपंपाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात वारकऱ्यांना भोजनाचा आनंद घेता येणार आहे. उपवासाच्या दिवशी वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पिण्यासाठी जारचे थंडगार पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या मार्गावरून अनेक पालख्यांसोबत हजारो वारकरी पंढरपूरकडे जात असतात. त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

Leave a comment

0.0/5