Skip to content Skip to footer

शिवसेना-भाजपचं सत्तावाटप समसमानच – चंद्रकांत पाटील

शिवसेना-भाजपचं सत्तावाटप समसमानच – चंद्रकांत पाटील

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा आणि सत्तावाटपाचा निर्णय झालेला असून ते समसमानच म्हणजे ५०%-५०% होईल असं भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती नक्की असून विधानसभेच्या ५०% जागा आणि सत्तेत ५०% भागीदारी हाच युतीचा फॉर्म्युला असल्याचं पाटील म्हणाले. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना युतीमध्ये सगळं समसमानच हवं असं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केलं होतं. यावर अवधूत वाघ, गिरीश महाजन आणि सरोज पांडे अशा भाजपच्या नेत्यांकडून “मुख्यमंत्री भाजपचाच” अशी प्रतिक्रिया आली होती. यानंतर गिरीश महाजनांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची माफी मागितली असल्याचं वृत्त आलं होतं. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जातं.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. महाराष्ट्र सरकारमध्येही ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकारांशी बोलताना युतीचा ५०%-५०% फॉर्म्युला असल्याचं सांगितल्याने याच फॉर्म्युल्यावर युती होणार की आणखी काही फॉर्म्युला पुढे येणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

भाजपा-शिवसेनेत जागावाटप आणि भागीदारीत ५०-५० चा फॉर्मुला निश्चित……

Leave a comment

0.0/5