Skip to content Skip to footer

एसटी महामंडळ भरतीत दुष्काळग्रस्थ भागातील तरुण-तरुणींना प्रथम प्राधान्य…..

राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिह्यातील चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱया उमेदवारांचा गुणवत्ता क्रम लावताना दुष्काळग्रस्त जिह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. काही दिवसापूर्वीच राज्यात पडलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोफत पास वाटपाचा कार्यक्रम सुद्धा एसटी महामंडळाने हाती घेतला होता.

राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा, शहीद जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांचे वारस, दुष्काळग्रस्त भागातील तसेच सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने भरीव योगदान दिले असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींची एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती करण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी व शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत पास, गणवेश व विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5