Skip to content Skip to footer

गुजरातहून आलेला ५ लाखांचा गुटखा गुन्हे शाखेने पकडला

गुजरात येथून वाहनातून आणला जाणारा पाच लाख रुपये किमतीचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने आरटीओ कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी पकडला. वाहनासह दोघांना गुटख्याच्या साठ्यासह ताब्यात घेतले आहे.गुजरात येथून रेल्वेस्टेशनमार्गे शहरात गुटखा येणार असल्याखी माहिती गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. अन्न औषधी विभागाचे पथकही यात सहभागी झाले होते. दरम्यान, या भागातून जाणारा टेम्पो (एमएच-२० डीई-५९७) पथकाने थांबवला. टेम्पोबाबत विचारणा केली असता जितेश अशोक कुरलिये (४२, रा. हनुमाननगर, औरंगाबाद) , विकास पुंडलिक चव्हाण (२४) यांंनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात २० गोण्या हिरा पान मसाला, रॉयल ७१७ तंबाखू १० मोठ्या गोण्या, असा ४ लाख ७५ हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले असून, २ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो, असा एकूण ७ लाख २५ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. गुटखा आणणाऱ्या दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वेदांतनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, अन्न औषधी निरीक्षक मो. फरीद सिद्दीकी, गुन्हे शाखेचे एएसआय नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, प्रकाश चव्हाण, बापूराव बावस्कर, गजानन मांटे, लालखाँ पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, विठ्ठल सुरे, पंढरीनाथ जायभाये, विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.

Leave a comment

0.0/5