Skip to content Skip to footer

हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील-खैरे

हिंदूंच्या नादाला लागू नका अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील-खैरे

शिवसेना कधीच जातधर्म पाळत नाही, परंतु जातीवादी व धर्मांधांना माफही करत नाही. त्यामुळे हिंदूंच्या नादाला लागू नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दगडफेक करणाऱ्या धर्मांधांना दिला. संभाजीनगर येथे गुरुवारी पहाटे हिंदूंच्या घरावर दगडफेक झाली. यावेळी गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच काहीजण जखमीही झाले होते.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी आज जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि विचारपूस केली. दगडफेकीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्याविरोधात काम केलेल्यांना चिरडून मारू, इम्तियाज जलील यांची काँग्रेस नगरसेवकाला धमकी

लोकसभा निवडणुकीत चार टर्म खासदार असलेल्या खैरेंचा पराभव एमआयएमच्या जलील यांनी केला होता. तेंव्हापासून संभाजीनगरमधील केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक वातावरणही तापत असल्याच चित्र आहे. आगामी विधानसभा आणि त्यानंतर वर्षभरात येणारी संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता संभाजीनगरमधील वातावरण संवेदनशीलच राहणार असल्याचं चित्र आहे.

Leave a comment

0.0/5