Skip to content Skip to footer

पंढरपूर यात्रेसाठी नागपूरहून दोन विशेष रेल्वेगाड्या

नागपूर : पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.
पंढरपूरला दरवर्षी विदर्भासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यात मोठी गर्दी होते. रेल्वेगाड्यातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पंढरपूरला दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०१२०६ नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी १० जुलैला सकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ७.५८, वर्धेला ९ वाजता, पुलगावला ९.२५, धामणगावला ९.४५, चांदूरला १०.०५, बडनेरा १०.४०, मूर्तिजापूर ११.१७, अकोला ११.४० वाजता आणि पंढरपूरला दुसºया दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२०५ पंढरपूर-नागपूर विशेष रेल्वेगाडी पंढरपूरवरून शनिवारी १३ जुलैला पहाटे ५.३० वाजता सुटेल.

ही गाडी अकोला सायंकाळी ६.४७, मूर्तिजापूर ७.१८, बडनेरा ८.०८, चांदूर ८.४८, धामणगाव ९.०७, पुलगाव ९.२५, वर्धा १० वाजता, अजनी रात्री ११ आणि नागपूरला ११.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १८ कोच असून त्यात २ तृतीय वातानुकूलित, १२ स्लीपर, २ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a comment

0.0/5