बीडीडी चाळीचा पुर्नविकास हा आशिया खंडातील सर्वात मोठा पुर्नविकास प्रकल्प असले – मुख्यमंत्री

बीडीडी |BDD chawl rehabilitation is the largest rehabilitation project in Asia

मुंबईतील नायगाव, दिलाई रोड, वरळी आणि शिवडी भागात असलेल्या बीडीडी चाळीचा लवकरात-लवकर पुर्नविकास करण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. एसआरए प्रकल्पात रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. विकासक काही काळानंतर रहिवाशांना भाडे सुद्धा देत नाही. यासाठी तीन महिन्याचे आगाऊ भाडे देण्याचा निर्णय शासन घेत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेली आहे. त्यामुळे या भागातील मोडकळीस आलेल्या आणि ब्रिटिश कालीन इमारतीचा लवकरच कायापालट होणार आहे.

तसेच बीडीडी चाळीतील ना.म जोशी मार्ग येथील रहिवाशांचे स्थलांतर सुरु झालेले असून वरळी भागातील १४ बीडीडी चाळीचे सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झाले आणि लवकरच तेथील राशिवाशांचे स्थलांतर होणार आहे. येथील रहिवाशांना ५०० चौ. फुटापेक्षा मोठं घर मिळणार आहे. बीडीडी चाळीचा पुर्नविकास हा आशिया खंडातील सर्वात मोठा पुर्नविकास प्रकल्प असले अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here