कोरपना : आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे.
निसर्गरम्य माणिकगड पहाडाच्या दºया खोर्या व पक्कडीगुड्डम जलाशयपासून जाणारा चनई- येरगव्हाण -धनकदेवी- जिवती हा २२ ते २५ किलोमीटरचा जवळपास पंधरा गावाला जोडणारा रस्ता आहे. त्याचे संपूर्ण डांबरीकरण व मजबुतीकरण झाल्याने कोरपना व जिवती या दोन्ही तालुका मुख्यालयाचे अंतर खूपच कमी झाले आहे.
तसेच प्रवासातली दगडधोंड्याची मोठी अडचण दूर झाल्याने प्रवासही निसर्गपूर्ण वातावरणात आल्हाददायक व सुखकर बनला आहे. त्यामुळे येणाºया जाणाºया प्रत्येक वाटसरूकडून या रस्त्याच्या निर्मितीबाबत कौतुकास्पद गौरवउद्वार बाहेर पडतात.