Skip to content Skip to footer

जीप उड्डाणपुलास धडकून एक ठार, नऊ जण जखमी

नांदेड येथे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथील उड्डाणपुलास धडकून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महादेव आप्पाराव कुंभार (वय ४४ रा़ काझीकणबस, ता. अक्कलकोट) हे मयत झाले आहेत. तर प्रभाकर  निनगुरे (वय ३८ रा़ मानकापूर ता़ चिक्कोडी जि़ बेळगाव), शंकर जाजू कुंभार (वय ५२), संगीता शंकर कुंभार (वय ४२ सर्व रा़ काझीकणबस, ता. अक्कलकोट), लक्ष्मीबाई भोजना राजपोड (वय ६० रा़ भोकाट जि-नांदेड), सविता पिराजी आंबटेवाड (वय ३०, रा.भोकाट जि़ नांदेड), पद्मिनी शामल शिरोळे (वय ५०, रा. मुदखेड जि़ नांदेड), संभाजी माणिकराव सिंगणवाड(वय ५५ रा़ हळदा ता़ भोकाड जि़ नांदेड),

ती राजी बाळू आंबटेवाडी (वय ६८ रा. हळदा), श्रीधर शंकर कुंभार (वय २७, रा़ काझीकणबस ता़ अक्कलकोट) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण कॉलीस जीप (क्र- एम एच-०२ केए ६९३५) मधून जात होते. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5