Skip to content Skip to footer

पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत; ‘या’ गाड्या रद्द

मुंबई: रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. याशिवाय या दोन्ही मार्गांवरील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने पश्चिम रेल्वे ची सेवा विस्कळीत झाली आहे.

गुजरात,डहाणू वरून मुंबई कडे जाणारी  फ्लाईग राणी एक्सप्रेस (8.25 वाजता) ,वलसाड फास्ट पॅसेंजर (7.10) दिवा-वसई मेमो (8),डहाणू-पनवेल मेमो (6.02),डहाणू-अंधेरी लोकल (5.16), सूरत-विरार शटल (9.31), यांच्यासह चर्चगेट वरून डहाणू कडे जाणाऱ्या चर्चगेट डहाणू(6.48 वाजता) (7.26 वाजता), विरार डहाणू(6.08) आदी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने मुंबई आणि गुजरात कडे जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थ्यांचे हाल झाले..

या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल 
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हावडा-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस.

मध्य रेल्वेकडून या गाड्या रद्द
सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सीएसएमटी ते पुण्यादरम्यान रद्द
पुणे- भुसावळ एक्स्प्रेस
पुणे-पनवेल पॅसेंजर
पनवेल-पुणे पॅसेंजर
पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस

Leave a comment

0.0/5