Skip to content Skip to footer

मराठीसाठी शिवसेनेइतकं कोणीही केलं नाही-विनोद तावडे

मराठीसाठी शिवसेनेइतकं कोणीही केलं नाही-विनोद तावडे

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव पुराव्यांनिशी अंतिम टप्प्यात आहे, लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली. यावेळी त्यांनी “शिवसेनेने जेवढं मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलं आहे तेवढं कोणीही केलेलं नाही” असं ठाम मत मांडलं आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याबाबत राष्ट्रवादीचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना तावडे बोलत होत्र. मराठीला अभिजात भाषा दर्जा देणं हा केंद्रीय मंत्रिमंडळापुढील विषय आहे असं त्यांनी सांगितलं. यानंतर दिवाकर रावतेंनी आग्रह करूनही आपलं नाव इंग्रजी उच्चाराप्रमाणे मराठीत आजही मंत्रालयात लिहिलं जातं असं सांगत नाराजी व्यक्त केली. आजही कॅबिनेट मंत्री असच म्हटलं जातं अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा

Leave a comment

0.0/5