मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत. त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.