Skip to content Skip to footer

सोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन!

भारतातील सोन्याच्या आयातीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन १२ टक्के केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सोन्याचे भाव व भारतातील सोन्याच्या भावात एका तोळ्यामागे किमान ५ हजार रुपयांचे अंतर असल्याने दुबई, अबुधाबीवरुन भारतात सोन्याच्या होणाऱ्या तस्करीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़.

हे सोने कोठेही कागदपत्री दाखविले जात नसल्याने त्यातून भष्ट्राचार वाढणार आहे़.दुबई, अबुधाबी येथून पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातून दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन आणलेल सोने पकडले जाते़. अनेकदा हे तस्कर इतके स्मार्ट झाले आहेत की, ते दरवेळी वेगवेगळ्या मार्गाने सोने चोरुन आणत असतात़ सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या हाताला लागलेले हे सोने आहे़. प्रत्यक्षात त्यांच्या नजरेतून सुटलेले किती सोने येते याची कोणतीही माहिती नाही़.

दुबई, आबुदाबी येथून येणारी आंतरराष्ट्रीय विमाने पुण्यात आल्यानंतर ती पुढील स्थानिक विमानप्रवासासाठी वापरली जातात़. त्यामुळे अनेकदा तस्कर विमानातच एखाद्या ठिकाणी सोने दडवून ठेवतात व पुण्यात ते उतरुन जातात़ .त्यानंतर पुण्यातून त्यांचे साथीदार पुढच्या प्रवासासाठी बसतात व प्रवासादरम्यान विमानात लपवून ठेवलेले सोने ताब्यात घेतात़. देशांतर्गत प्रवासात प्रवासी उतरल्यानंतर त्यांची तपासणी होत नसल्याने ते सहीसलामत सोने घेऊन निघून जातात़.

अशाप्रकारे १६ जूनला स्पाईस जेटच्या वॉश बेसिनच्या खाली लपवून ठेवलेली ५३ लाख रुपयांची ६६३ ग्रॅम वजनाची १४ सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती़. १३ मे रोजी १६ लाख ७१ हजार रुपयांचे ६६४ ग्रॅम सोने पेस्ट स्वरुपात आणण्यात आले होते़. ७ मे रोजी ३१ लाखांचे ९५७ ग्रॅम सोने प्लॅस्टिकच्या बेल्टमध्ये लपवून आणण्यात आले होते़.

१८ मार्च २०१९ रोजी एक पुरुष कमरेच्या प्लॅस्टिकच्या पट्टीमध्ये पेस्ट स्वरुपातील १४ लाख रुपयांचे ५५९ ग्रॅम सोने घेऊन आला होता़. तो सीमा शुल्क विभागाच्या हाती लागला होता़. १५ मार्च २०१९ रोजी ३० लाख रुपयांचे सोने पकडण्यात आले होते़.ज्यांना पैशांची आवश्यकता आहे़ अशांना हे तस्कर हेरतात़ अशा लोकांना ते काम शोधण्यासाठी दुबई, अबुधाबी येथे मुंबई किंवा इतर विमानतळावरुन पाठवितात़. त्यानंतर दोन दिवसांनी ते तस्करीचे सोने घेऊन पुण्यात किंवा गोवा येथे येतात़. अनेकदा ते अशा पद्धतीने सोने घेऊन येतात की विमानतळावरील एक्सरे मशीनमध्येही दिसून येत नाही़.

Leave a comment

0.0/5