Skip to content Skip to footer

भगदाड पडलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचे स्वखर्चातून दगड

भगदाड पडलेल्या बंधाऱ्याला दुरुस्तीसाठी शिवसेनेचे स्वखर्चातून दगड

मालवण येथील देवबाग बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी स्वखर्चातून दगड उपलब्ध करून दिले आहेत. या बंधाऱ्याला पाऊस आणि समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे भगदाड पडले होते. ख्रिश्चनवाडीजवळ हे भगदाड पडलेलं असून समुद्राच्या लाटांचे तडाखे बसून बंधाऱ्याचे काळे दगड वाहून जात आहेत. नुकतीच कोकणात तिवरे धारण कोसळण्याची घटना घडलेली आहे. या पार्शवभूमीवर देवबाग बंधाऱ्याला भगदाड पडल्याचे वृत्त समजताच स्थायिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने हालचाल सुरु केली. त्यांनी सरकारी निधीची वाट न पाहता स्वखर्चातून काही ट्रक मोठे काळे दगड हे बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी तात्काळ उपलब्ध करून दिले. नाईक यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच मदत पुरवल्याने पुढील धोका टळला आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती सुरु झाली असून आवश्यकतेनुसार आणखी मदत पुरवली जाईल असं सांगत नाईक यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला.

सदर बंधारा हा आधीपासूनच नादुरुस्त झाला असून या बंधाऱ्याची दुरुस्ती आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने याआधीच सुरु करण्यात आली आहे. काही अतिधोकादायक ठिकाणांवर लाटांच्या तडाख्यांपासून वाचण्यासाठी जिओ ट्यूबची उभारणी तर आणखी चार जागी बंधारा दुरुस्ती ही कामे प्रगतीपथावर आहेत.

 

नितेश राणेंवर खुनाचा प्रयत्नांचा कलम लावण्याचे मी आदेश दिले आहे-चंद्रकांत पाटील

Leave a comment

0.0/5