Skip to content Skip to footer

शिवसेना आमदार आणि तिवरे दुर्घटनाग्रस्तांचं अनोखं नातं जगासमोर

शिवसेना आमदार आणि तिवरे दुर्घटनाग्रस्तांचं अनोखं नातं जगासमोर

कोकणातील तिवरे धरण फुटलं. त्यात अनेकजण वाहून गेल्याचं समोर आलं. लगेचच दुर्घटनेस जबाबदार कोण? याची शोधमोहीम मीडियाने सुरु केली. यात स्थानिक शिवसेना आमदार असलेले सदानंद चव्हाण यांचं नाव पुढे आलं. एवढंच नव्हे, तर याच आमदारांच्या बंधूंच्या कंपनीनेच धरणाचं काम केलं असल्याचं समोर आलं. त्यानंतर धरण २००४ मध्येच राज्य सरकारकडे हस्तांतरित केलं होतं. मात्र मीडियाने सदानंद चव्हाण यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून आरोप झाले. मीडियाच्या वार्ताहरांनी सदानंद चव्हाण हे दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या नजरेत खलनायक आहेत असं चित्र महाराष्ट्रासमोर उभं केलं, पण वास्तव पूर्णपणे वेगळंच आहे.

सदर धरण फुटल्याची घटना घडताच स्थानिक आमदार या नात्याने सदानंद चव्हाण यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी तीन-चार वेळा दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली आणि स्थानिकांची विचारपूस केली. ८ जुलै रोजीसुद्धा संध्याकाळच्या सुमारास सदानंद चव्हाण दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला अचंबित करणारं आहे. चव्हाण हे स्थानिकांसाठी खलनायक नसून कुटुंबप्रमुखाप्रमाणे आहेत. आमदार आल्याचं समजताच दुर्घटनाग्रस्तांचे नातेवाईक साहेब, साहेब म्हणत पुढे आले. सदानंद चव्हाण यांना बिलगून अश्रू ढाळू लागले. आमदार चव्हाणांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दुर्घटनाग्रस्त नागरिक आणि आमदारांचे हे ऋणानुबंध पाहून उपस्थित प्रशासकीय अधिकारी अवाक झाले.

ज्यांचा परिवार तिवरे दुर्घटनेत गेला ते तानाजी चव्हाण पुढे झाले आणि त्यांनी सदानंद चव्हाणांना उद्देशून “साहेब, तुम्ही आम्हाला दूर लोटू नका, तुम्ही आमचे आहात..आम्हाला तुमचाच आधार आहे” असा आर्जव केला आणि मग आमदार सदानंद चव्हाणांनी सुद्धा सारं काही विसरून भावनांना वाट करून दिली. तानाजीने चव्हाण यांनी आमदार सदानंद चव्हाण यांना सांगितलं की “आम्हाला पैसे किती मिळतात ते महत्वाचं नाही, आपण एक कुटुंब म्हणून आहोत. तुम्हीच खचलात तर आम्हाला कोणी वाली राहणार नाही.” आमदार चव्हाण आणि स्थानिक दुर्घटनाग्रस्तांचं हे अनोखं नातं पाहून उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा गहिवरले.

ज्यांना मीडियाने खलनायक म्हणून पुढं केलं तो माणूस दुर्घटनाग्रस्त जनतेसाठी नायक आहे हेच यावेळी दिसून आलं.

भगदाड पडलेल्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचे स्वखर्चातून दगड

Leave a comment

0.0/5