Skip to content Skip to footer

बेस्ट दरकपात:मुंबईकरांची चार महिने आधीच दिवाळी

बेस्ट दरकपात:मुंबईकरांची चार महिने आधीच दिवाळी

“बेस्ट” बसेसच्या दरामध्ये केलेली ऐतिहासिक दरकपात कालपासून लागू झाली. बसच्या किमान दरात तब्बल ३ रुपयांची कपात झाली. बेस्टच्या ५ किमी प्रवासासाठी ८ ऐवजी ५ रुपये मोजावे लागणार आहेत. १० किमीसाठी १०, १५ किमीसाठी १५ रुपये मोजावे लागतील. १५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी फक्त २० रुपये मोजावे लागतील. शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक दरकपात जाहीर झाली होती.

या दरकपातीमुळे महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आनंदित झालेल्या मुंबईकरांनी काल अक्षरशः चार महिने आधीच दिवाळी साजरी केली. बेस्टचे बस थांबे गर्दीने ओसंडून वाहिले. तोट्यात असलेल्या बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी बेस्टला या उपक्रमामुळे प्रचंड फायदा होईल असं चित्र आहे.

या दरकपातीमुळे सर्वसामान्य मुंबईकर अत्यंत खुश असून बेस्ट बसऐवजी खाजगी वाहनांचा पर्याय निवडणारे लोक आता बेस्टकडे वळल्याचं चित्र काल संपूर्ण मुंबईभर पाहायला मिळालं. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय बजेटनंतर पेट्रोल व डिझेल भाववाढ झाली. आगामी काळात ही भाववाढ नऊ रुपयांपर्यंत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणारा मोठा वर्गही “बेस्ट”कडे आकर्षित होऊन “बेस्ट” ला याचा फायदा होणार आहे. एकूणच “बेस्ट” बसेसची दरकपात करून शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे.

जनसामान्यांकडून स्वागत

बेस्ट दरकपातीनंतर प्रवासी तिकिटाचे फोटो आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईकरांनी बेस्ट दरकपातीचं स्वागत केलं. हा निर्णय फायदेशीर असल्याचंही मुंबईकरांनी म्हटलं आहे. मुजोर खाजगी वाहनचालकांना कंटाळलेल्या मुंबईकरांनी इथून पुढे “बेस्ट” प्रवासालाच पसंती देणार असल्याचं सांगितलं. अनेक नागरिकांनी दिलखुलासपणे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत त्यांचं काम चांगलं असल्याचं म्हटलं आहे. शिवाय आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देत आभार मानले आहेत.

 

शिवसेनेने करून दाखवलं ! बेस्ट झाली आणखी बेस्ट..

Leave a comment

0.0/5