मीडिया आता तानाजी सावंत यांची माफी मागणार का?

तानाजी सावंत
ads

 

कोकणातील तिवरे धरण फुटलं आणि त्यात अनेकांचा बळी गेला. धरण फुटण्याच कारण या विषयावर मीडियाची खलबतं सुरु झाली. नुकतेच जलसंधारण मंत्री म्हणून कार्यरत झालेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना एका वाहिनीच्या पत्रकाराने धरण फुटण्याची कारणं काय आहेत? असा प्रश्न विचारला. यावेळी सावंत यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार धरणात असलेले खेकडे त्रासदायक ठरले असल्याचं म्हटलं होता. शिवाय धरण का पडलं हे शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती सांगेल आणि त्यानुसार कारवाई होईल असंही ते म्हणाले होते.

यावर मीडियाने आणि सोशल मीडियाने त्यांना खलनायक ठरवलं, मात्र “मेरी”च्या अहवालानुसार खेकडे धरण फोडू शकतात हे पुराव्यासहित शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. हीच बाब “महाराष्ट्र बुलेटिन”ने सावंतांवर टीका होत असताना मांडली होती. सर्वत्र सावंत यांना खलनायक ठरवून टीका होत असताना “महाराष्ट्र बुलेटिन”ने मात्र सत्य काय आहे हे शोधून सावंतांची बाजू मांडणारा लेख लिहिला होता. हा लेख महाराष्ट्रभर गाजला.

आता तर खुद्द शास्त्रज्ञच म्हणतात की “हो..खेकड्यामुळे फुटू शकतं धरण”. त्यामुळे आता सावंतांना खलनायक ठरवून बदनामी करणारी मीडिया आणि सोशल मीडियातील टीकाकार सावंतांची बिनशर्त माफी मागणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तानाजी सावंत जे बोलले ते समजून न घेता मीडियाने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. त्यांच्या संपूर्ण मुलाखतीतील खेकडा हा एकच शब्द पकडून सावंतावर प्रचंड टीका केली. सावंत जे बोलले ते अधिकारी आणि ग्रामस्थांच्या हवाल्याने बोलले होते. मात्र त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही.

कोणीही खेकडे धरण फुटण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात का? याचा शोध घेतला नाही. फक्त सावंतावर टीका करून टीआरपी मिळवला. न्यूज चॅनेल्सनी तर ऍनिमेटेड व्हिडिओ दाखवून खेकडे गाण्यावर नाचताना दाखवले.

ही कसली पत्रकारिता?

हे कमी म्हणून की काय मीडियाने खेकडा हे फक्त स्थानिक शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी कारण म्हणून पुढे केलं जात आहे असा थेट आरोप सावंतांवर केला. एखाद्याची चूक नसताना त्याच्यावर टीका करून बदनामी करणं ही कसली पत्रकारिता?

सावंतांचा फक्त खेकडा शब्द पकडून त्यावर ऍनिमेटेड व्हिडिओ दाखवण्याऱ्या न्यूज चॅनेल्सनी कोणता आदर्श समाजासमोर ठेवला आहे? जनता मीडियातील बातम्यांद्वारे आपलं मत बनवत असते. अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या देणं ही समाजाची फसवणूक आहे. याबद्दल मीडिया महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागणार का? तानाजी सावंतांची नाहक बदनामी झाली त्याबद्दल सावंतांची माफी मागणार का?

आजच्या मीडियामध्ये एवढी प्रगल्भता आणि मनाचा मोठेपणा असेल अशी अपेक्षा नाही. परंतु प्रत्येक पत्रकाराने आपण काय दर्जाची पत्रकारिता करतो याचं एकदा आत्मपरीक्षण करून उत्तर शोधावं. स्वतःचीच स्वतःला लाज वाटेल आणि मान आपोआप खाली जाईल.

हो..खेकड्यांमुळे सुद्धा फुटू शकतं धरण..

16 प्रतिक्रिया

 1. शिवसेना हाच खरा सामान्य गोरगरीब जनतेचा व शेतकऱ्याचा कैवारी आहे हे सिद्ध झालं ,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे संस्थानिक आहेत व ४० वर्षात तसे ते बनले,बाकी शेतकऱ्यांविषयी यांना काही देणघेणं नाही उलट दिनदुबळ्या शेतकऱ्याला यांनी लाचार बनवलं

 2. कार्लेखिंड ते सारळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे असे हाशिवरे शिवसैनिकांना समजताच त्यांनी सदर रस्त्याचे काम P.W.Dचे अभियंता यांना विचारले काम इन्स्ट्रुमेंट योग्यतेनुसार करण्यात यावे असे सांगताच . शे. का. प. चे गुंड येऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करू लागले आणि ते कृत्य सुरू असताना स्थानिक आमदार पुत्र श्री. सवाई पाटील तेथे हजर होते व म्हणत होते की .तुम्ही फक्त हाशिव-याचा रोड बघा दुस-या गावातील रोडशी तुमचा काही संबध नाही आम्ही विभाग सांभाळतो आम्ही ठरवू तसाच रोड बनवू.तुम्ही तुमच्या गावापुरता चांगला रस्ता बनवून घ्या आणि पुन्हा जोरात ओरडून सांगतात कि लोक आम्हाला फुकट इतकी वर्षे निवडून देत नाहीत ( कसेही काम केले तरी लोक निवडून आम्हालाच देतात )असे वक्तव्य करून आम्ही वाटेल तसा रस्ता बनवू असे म्हणाले व शिवीगाळ करू लागले.सदर घटनेचे चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते त्यामुळे मारहाण करण्यास जबाबदार गुंडांविरुढ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली .परंतु सदर घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित नसलेल्या व्यक्ती म्हणजेच हाशिवरे गावातील सरंपच संध्या नदुंकुमार पाटील यांच्याकडून ठेकेदाराला विचारला गेलेल्या शिवसैनिकांनावर खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे याचा अर्थ प्रशासन गुंडांच्या बाजूने आहे कारण चित्रीकरण उपलब्ध असताना त्या वेळेत खोटी तक्रार देणारी व्यक्ती तेथे हजर नसतानाही तक्रार घेतली कशी जाते आणि घडलेल्या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध असतानाही खोटी तक्रार केली जाते याचा सरळ अर्थ रस्ता गुंडांच्या मालकीचा असावा आणि p.w.d. गुंड लोक चालवीत असावे म्हणूनच रस्त्यांची दुर्दशा होत असावी..जनतेचा पैसा असले गुंड लुबाडत असतील तर न्याय मिळणार कसा? हा आहे शेकापचा फसवा विकास …..

 3. Howdy! I know this is kind of off-topic however I needed to ask.
  Does running a well-established website like yours require a large amount of work?
  I’m completely new to operating a blog but I do write in my diary daily.
  I’d like to start a blog so I can easily share my personal experience and feelings online.
  Please let me know if you have any recommendations or tips for
  new aspiring blog owners. Appreciate it!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here