Skip to content Skip to footer

शिवसेनेला मोठं यश: मोर्चा आधीच सरकार देणार पीक विमा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा प्रश्नावर गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांसाठी पावलं उचलली आहेत. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अन्यथा शिवसेना आपल्यास स्टाईलने पीक विमा कंपन्यांना धडा शिकवेल असा इशारा त्यांनी दिला होता. शिवाय शिवसेनेने राज्यातील ग्रामीण भागात पीक विमा केंद्रांची उभारणी करून लाखो शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज भरून घेतले होते. यात पीक विमा कंपन्या आणि सरकारी व्यवस्था शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचं शिवसेनेच्या लक्षात आलं.

यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका जाहीर करत येत्या १७ जुलै रोजी वांद्रे – कुर्ला संकुल येथील पीक विमा कंपनीवर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. तरीही पीक विमा कंपन्या आणि प्रशासन जागे झाले नाही तर यापेक्षा आक्रमक भूमिका घेऊ असा इशाराही त्यांनी दिला होता.

यानंतर हादरलेल्या पीक विमा कंपन्या आणि सरकारी व्यवस्था अधिकाऱ्यांनी पीक विमा देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खुद्द सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिवसेनेचा मोर्चा निघण्यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाईल, शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक केली जाणार नाही असं जाहीर केलं. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला मिळालेलं हे मोठं यश मानलं जातं.

शिवसेनेचा मोर्चा झाल्यास सरकारी यंत्रणेचा कारभार उघडकीस येईल या भीतीने सरकारी अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाली करत मोर्चा निघण्याच्या आधी पीक विमा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा मोर्चा उद्धव ठाकरे मागे घेतील अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ मिळाल्यास हे शिवसेनेला मिळालेलं मोठं यश मानलं जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला पसंती देईल असं चित्र आहे.

शिवसेनेचे दणका १४ हजार शेतकऱ्यांना मिळणार फळबाग विमा……

Leave a comment

0.0/5