Skip to content Skip to footer

शिवसेनेने शब्द पाळला:७०% मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे

 

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनांदरम्यान मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान हजारो मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७०% गुन्हे हे मागे घेतले गेले आहेत. मराठा आंदोलनातील युवकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हे कायम राहिल्यास तरुणांना शैक्षणिक आणि नोकरीविषयक अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील असा शब्द मराठा मोर्चा नेत्यांना दिला होता. तो त्यांनी पाळला आहे. मराठा समाजाची ही मागणी शिवसेनेने बुलंद केली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाचे नेते आणि कोपर्डीच्या निर्भयाचे आई-वडील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी केली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी “मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला जाईल” असं वचन दिलं होता. त्यानुसार या भेटीनंतर केवळ १५ दिवसात हे गुन्हे मागे घेत असल्याचं सरकारे जाहीर केलं आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करत लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करण्याचा आग्रह धरला होता. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ७०% गुन्हे आता मागे घेण्यात आले आहेत.

उर्वरित ३०% गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून याबाबत सरकार तोडगा काढण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १००% गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याप्रकरणी त्यांचाच निर्णय अंतिम असणार आहे. एकूणच मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

युतीने शब्द पाळला: शिवसेना-भाजपने जाहीर केलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात वैध

Leave a comment

0.0/5