Skip to content Skip to footer

“तुम्हाला एकावेच लागेल” गृह मंत्री अमित शहा ओवेसींवर भडकले…..

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावरून सोमवारी लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. राष्ट्रीय तपास यंत्रणेला मजबूत बनविणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्यपाल सिंह यांच्या भाषणात ओवेसी यांनी वारंवार अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर गृहमंत्री शहा यांनी तुम्हाला ऐकावेच लागेल, अशा शब्दांत ओवेसींना खडेबोल सुनावले.

एनआयए सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान भाजप खासदार सत्यपाल सिंह मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे. कारण मुंबईत नेहमीच राजकीय चष्म्यातून दहशतवाद पाहिला गेला, असे म्हणाले. हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी राज्यातील एका नेत्याने हैदराबादच्या पोलीसप्रमुखांना तपासाची दिशा बदलण्यास सांगितले होते. जर असे केले नाही तर बदली करण्याची धमकी दिली होती असा आरोपही त्यांनी केला. त्यास हैदराबादचे खासदार असदुद्दीने ओवेसी यांनी आक्षेप घेत पुरावे सादर करण्याची मागणी केली.

त्यावर अमित शहा यांनी दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे. आता तुम्हाला ऐकावेच लागेल, असे खडे बोल सुनावत ओवेसींना खाली बसण्यास भाग पाडले. शहा आणि ओवेसी यांच्यात या दरम्यान शाब्दिक संघर्ष झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ‘एनआयए’चा वापर फक्त आणि फक्त देशातील दहशवाद संपविण्यासाठीच सरकार करणार असल्याची निसंदिग्ध ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेला दिली.

Leave a comment

0.0/5