Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंचा झंझावात, राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

अनेक पक्ष फक्त निवडणूक आली की जनतेसमोर जातात आणि ५ वर्षे सत्तेत किंवा विरोधात बसतात, मात्र शिवसेनेचं तसं नाही. तुम्ही सगळे आमची नेत्यांची भाषणं ऐकत असता, ही यात्रा मी तुमचं ऐकण्यासाठी काढली आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसेनेत ८०% समाजकारण आणि २०% राजकारण असेल, पण मी सांगतो की शिवसेनेने जेंव्हा १००% राजकारण केलं ते केवळ १००% समजकारणासाठी केलं. ज्यांना ज्यांना मदत लागते त्यांची जात,गोत्र,धर्म न बघता मदत करा असं शिवसेनेचं समाजकारण सांगतं. ज्यांनी शिवसेनेचं कामं पाहिलं तो शिवसैनिक झालाच. ज्यांनी आपलं काम, आपलं प्रेम दाखवलं नाही त्यांना ते दाखवण्याची वेळ आली आहे असं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी धरणगाव येथील विजय संकल्प सभेत बोलताना केलं. त्यांच्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

तुम्ही कुठल्याही जातीचे,धर्माचे असाल कोणीही असाल आणि अडचणीत असाल तर काही वाईट विचार मनात आणू नका, तर शिवसेनेचा विचार मनात आणा, शिवसैनिकांचा विचार मनात आणा, आम्ही तुमची मदत करू असं आवाहन आदित्य ठाकरेंनी तमाम जनतेला केलं. मुख्यमंत्री वगैरे कोण होणार यासाठी मी आलोच नाही, मला समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आणि आणि त्यासाठी महाराष्ट्राने एकत्र येण्याची गरज आहे. हा महाराष्ट्र शिवसेनाच घडवणार अशी मला खात्री आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

धरणगाव येथे पार पडलेल्या आदित्य ठाकरेंच्या या सभेत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यातील प्रमुख कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा पट्टा घालून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले शेकडो कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या या विजय संकल्प सभेला उपस्थित होते.

ही ठाकरे घराण्याची जादू-गुलाबराव पाटील

मी शिवसेनेत आलो त्यावेळी आदित्य ठाकरेंपेक्षा लहान वयाचा होतो. भाग्यवान असल्यानं मला बाळासाहेबांचं दर्शन झालं. उद्धव ठाकरेंसमोर गेलो तेंव्हा मी साधा शाखाप्रमुख होतो, आज तुमच्यासमोर एकेकाळी पान ठेला चालवणारा हा गुलाबराव पाटील मंत्री म्हणून उभा आहे, ही जादू फक्त ठाकरे घराणं करू शकतं असं मतं गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

आदित्य ठाकरेंमुळे विरोधी पक्षाचे मतदार शिवसेनेकडे येतील-एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या या जन आशीर्वाद दौऱ्यामुळे भगवं वादळ निर्माण झालं आहे. समोर उपस्थित जनसमुदायात शिवसैनिक आणि शिवसेनेचे मतदार तर असतीलच परंतु आदित्य ठाकरेंमुळे विरोधी पक्षांचे मतदार सुद्धा शिवसेनेकडे वळतील असं मतं एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. इतर पक्षांचे लोक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीतच जनतेसमोर येतात, मात्र आदित्य ठाकरे हे निवडणूक झाल्यावर आभार मानण्यासाठी जनतेसमोर आले आहेत. निवडणूक असो किंवा नसो शिवसेना कायम कार्यरत असतेच असं शिंदे म्हणाले.

माझा देव म्हणजे जनताच:आदित्य ठाकरे

2 Comments

  • Shri Dagadu Mahadev More
    Posted July 18, 2019 at 9:56 pm

    मी लहाण पणापासून शिवशेनेत आहे बालासाहेबांनी आमाला धडविले आहे 80 takke समाजकारन 20 takke राजकारन Jay Maharashtra आज माझे वय 40 Year aahe

Leave a comment

0.0/5