Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंकडून उत्तर महाराष्ट्राचा सन्मान

आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा महाराष्ट्रभर जाणार असून एकूण ४००० किमी एवढा प्रवास करणार आहे. एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या दौऱ्याचा शुभारंभ उत्तर महाराष्ट्रातून करून आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्राचा अनोखा सन्मान केला आहे. साधारणतः प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे दौरे हे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा शहरांतून सुरु होतात. असं असताना आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातून या दौऱ्यास शुभारंभ केला आहे.

उत्तर महाराष्ट्राने शिवसेनेला नेहमीच भरभरून यश दिलं. यामुळेच आदित्य ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातून या दौऱ्याची सुरुवात करत उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा साद घातली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हा उत्तर महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आणि महाराष्ट्रात सर्वाधिक यश देईल असं वरुण सरदेसाई यांनी यापूर्वीच बोलून दाखवलं आहे.

आदित्य ठाकरे यांचा दौरा कोल्हापुरातुन सुरु होईल अशी चर्चा होती. मात्र हा दौरा जाहीर झाला तेंव्हा आदित्य ठाकरे जळगावातून दौऱ्याचा शुभारंभ करणार असल्याचं समजलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उत्तर महाराष्ट्रातून दौऱ्यास प्रारंभ करण्याची रणनीती ही आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लाभदायक ठरेल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत असलेला नेता आपल्या जिल्ह्यातून दौऱ्याचा शुभारंभ करतोय याच जळगावकरांमध्ये कुतूहल आहे.

जन आशीर्वाद यात्रा:संपूर्ण जळगाव जिल्हा शिवसेनामय

Leave a comment

0.0/5