Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे:शिवसैनिक हे जगातलं सगळ्यात मोठं पद

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालेगाव येथे आज विजय संकल्प सभा घेतली. यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी शिवसैनिक हे जगातलं सगळ्यात मोठं पद आहे असं म्हटलं आहे. शिवसैनिक हा जनतेला विसरत नाही. शिवसेना हा दोन निवडणुकांच्या मध्येही कार्यालय सुरु ठेऊन २४ तास जनतेसाठी कामं करणारा आणि सेवा करणारा एकमेव पक्ष आहे असं ते पुढे म्हणाले.

ही सेवा काही निवडणुकीसाठी नसते,सत्तेसाठी नसते, पदांसाठी नसते किंवा आमदार, खासदार होण्यासाठी नसते. जगातलं सगळ्यात मोठं पद म्हणजे शिवसैनिक. मी शिवसैनिक आहे आणि मी लोकांची सेवा केली पाहिजे या भावनेतून प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात,शहरात,जिल्ह्यात,गल्लीत,तालुक्यात प्रत्येक शिवसैनिक “मी लोकांना माझी सेवा चांगली कशी देईन आणि शिवसेनेचं नाव,शिवसेनेचा झेंडा आणखी बुलंद कसं करीन. लोकांच्या मनात शिवसेना कशी रुजवीन” हाच विचार दिवसरात्र करत असतो.याच शिवसैनिकांचे आभार मानायला मी सगळीकडे फिरतोय अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांवर कौतुकाचा वर्षाव केला.

Leave a comment

0.0/5