Skip to content Skip to footer

मालेगावातून विधानसभा लढल्यास आदित्य ठाकरेंना सर्वपक्षीय पाठिंबा?

आदित्य ठाकरेंनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवावी अशी शिवसेनेतील अनेकांची ईच्छा आहे. मागील महिन्यात त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून युवासेना पदाधिकाऱ्यांनी “महाराष्ट्र आपली वाट पाहतोय” असे पोस्टर्स झळकावत आदित्य यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी भावना व्यक्त केली होती. सध्या आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद दौऱ्यावर आहेत. “मी मुख्यमंत्री घडावण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्र घडवण्यासाठी दौरा करतोय” असं कालच आदित्य यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे.

कालच शिवसेनेचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदारसंघातून विधानसभा लढवावी, त्यांना भरघोस मतांनी विजयी करू असं म्हटलं होतं. आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर बोलताना “आपण मालेगाव विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरा,बिनविरोध निवडून देऊ” असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा की मालेगाव येथून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक वाढवल्यास त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळू शकतो. असं झाल्यास हा राजकीय इतिहास मानला जाईल.

राज्यमंत्री दादा भुसेंनी आज हे वक्तव्य केलं असलं तरी इतर पक्ष सुद्धा याला सहमती दर्शवणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील उदयोन्मुख महानेता-मीडिया रिपोर्ट

Leave a comment

0.0/5