Skip to content Skip to footer

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांची आदित्य ठाकरेंनी घेतली भेट

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली असता त्यांनी “आधारतीर्थ” या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आश्रमाला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं . या ५ वर्षे वयाच्या आसपास असलेल्या चिमुकल्यांसोबत आदित्य ठाकरेंनी काही वेळ घालवला. येथील निरागस मुलांसोबत आदित्य ठाकरेंनी थेट जमिनीवर बैठक मारली आणि संवाद साधला.

आदित्य ठाकरेंनी या लहानग्यांना जवळ घेत मायेने विचारपूस केली. मुलांनीही आदित्य ठाकरेंशी हस्तांदोलन केलं. चिमुकल्यांनी यावेळी “शेतकऱ्यांनो आत्महत्त्या करु नका” असा संदेश लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. या मुलांसोबत आदित्य यांनी ध्यानधारणाही केली.

या ठिकाणाहूनच आदित्य ठाकरेंच्या आजच्या दिवसाला सुरुवात झाली.

आदित्य ठाकरे:शिवसैनिक हे जगातलं सगळ्यात मोठं पद

Leave a comment

0.0/5