Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंच्या मुलाखतीसाठी मीडियाच्या रांगा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौऱ्यावर निघाले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. या दौऱ्यात ठिकठिकाणी भेटी, विजय संकल्प सभा, रोड शो, वह्यावाटप, आदित्य संवाद,भूमिपूजन यासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व प्रत्येक तालुका यानिमित्ताने आदित्य ठाकरे पिंजून काढणार आहेत. एकूण ४००० किमी प्रवास असलेला हा दौरा सहा टप्प्यात पार पडेल अशी माहिती आहे. जूनमध्ये आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आलं आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत मीडियामध्ये सुद्धा कुतूहल आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्सच्या प्रतिनिधींनी रांगा लावल्याचं चित्र आहे. इंडिया टुडे ग्रुपची “आज तक” वाहिनी, एबीपी माझा/न्यूज, साम टीव्ही(सकाळ ग्रुप), NDTV, इत्यादींवर आदित्य ठाकरेंच्या मुलाखती पार पडल्या आहेत. प्रमुख मराठी,इंग्रजी व हिंदी वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला प्रसिद्धी दिली असून अनेकांनी मुलाखतीसाठी वेळ मागितला आहे. अनेक वर्तमानपत्रे/चॅनल्सचे प्रतिनिधी तर ही यात्रा पूर्णपणे कव्हर करण्यासाठी यात्रेसोबतच आहेत. आदित्य ठाकरेही यात्रेच्या व्यस्त वेळापत्रकातून मीडिया मुलाखतींसाठी वेळ देताना दिसत आहेत.

सर्वात आधी “ब्रेकिंग न्यूज” देण्यासाठी प्रसारमाध्यमांत स्पर्धा लागली असून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाबद्दल काय प्रतिक्रिया देतात याची उत्सुकता मीडियामध्ये दिसते. आदित्य ठाकरेंनी “मुख्यमंत्रीपदासाठी नाही तर आभार मानण्यासाठी मी जन आशीर्वाद दौरा करतोय” अशी प्रतिक्रिया दिली असली तरी मीडिया मात्र त्यांना आणखी बोलत करून “ब्रेकिंग न्यूज” मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

1 Comment

  • Rajanikant Shankarrao Patil
    Posted July 20, 2019 at 10:30 pm

    Adityaji nuste ashirwad nahi tar maat suddha tumhalach.faqt thaku naka ani hoil tevdhe pratyek gavapasun te jilha pataliparyant pratyekache nav lakshat theva.jase sharad pawar vimanatun basun sangtat ki he gav kontya talukyatle ahe. Yevdha jar tumhi kelat tar samja ithun pudhe maharashtrat faqt ani faqt shivsena.dusra pakshach nahi. Tarunanna sobat ghevun challaat; tar shala college chya kattyawar,canteen madhe tumchi charcha jhali pahije.mhanje maharashtrat Balashebanchi shivsenach.

Leave a comment

0.0/5