Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंकडून १ लाख २५ हजार वह्यांचे वाटप

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर सभा घेतली. यावेळी शिवसेना-युवासेनेकडून विद्यार्थ्यांना तब्बल १ लाख २५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मदत केंद्र सुरु करण्याचे आदेश आदित्य यांनी जिल्हाप्रमुखांना दिले.

काल धुळे येथे जन आशीर्वाद दौरा दाखल झाला. हा दौरा महाराष्ट्रातील शेजारी, कामगार, विद्यार्थी, युवती, सामान्य जनता अशा सर्व घटकांसाठी असेल असं याआधीच शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं होता. त्यात धुळे येथे आदित्य संवाद आणि वह्यावाटप असे दोन विद्यार्थीकेंद्रित कार्यक्रम झाले. “आदित्य संवाद” मार्फत आदित्य यांनी थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांची आदित्य ठाकरेंनी घेतली भेट

Leave a comment

0.0/5