Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंची जादू:जन आशीर्वाद दौऱ्याला “मनसे” शुभेच्छा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत” अशी या दौऱ्याची मुख्य टॅगलाईन आहे. आपल्या भाषणातही आदित्य ठाकरे यांनी “विरोधकांनो, एकदा आम्हाला आजमावून पहा, आमच्यासोबत हमखास याल असं मी छाती ठोकून सांगतो” असं म्हणत थेट विरोधकांना आपलंस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा उद्देश यशस्वी होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामधून एरवी विस्तव जात नसला तरी मनसे च्या एका पदाधिकाऱ्याने आदित्य ठाकरेंच्या भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की आदित्य ठाकरे यांचा धुळे येथे “आदित्य संवाद” कार्यक्रम होता. या कार्यक्रमास आदित्य ठाकरे यांचं आगमन झालं तेंव्हा त्यांना भेटण्यासाठी एका तरुणाने सुरक्षा व्यवस्था असतानाही पुढे येण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका सुरक्षारक्षकाने त्या तरुणास बाजूला केलं. ही बाब आदित्य ठाकरेंच्या लक्षात आली तेंव्हा त्यांनी त्या तरुणास बोलावून घेत त्यांची गळाभेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या या कृतीच सर्वच समाजमाध्यमात कौतुक होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल करत आदित्य ठाकरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल आणि आत्मीयतेबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आदित्य यांचा हा व्हिडीओ पाहून मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांचं कौतुक केलं आहे. “आज हा व्हिडीओ पाहून आदित्य साहेबांबद्दल आदर निर्माण झाला आहे, तुम्हाला भविष्यातील राजकीय कार्यासाठी खूप खूप मनसे शुभेच्छा” अशी प्रतिक्रिया या मनसे पदाधिकाऱ्याने फेसबुकवर दिली. मात्र मी एक कट्टर राजयोद्धा आहे, आणि शेवटपर्यंत राज साहेबांसोबतच राहणार असं या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जादू केली आहे असं म्हणायला हरकत नाही. विरोधकांची मनं जिंकण्याचा त्यांचा हेतू सफल होत असताना पाहायला मिळत आहे.

mns shubhechha

2 Comments

  • आशीष कुमार शुक्ला
    Posted July 22, 2019 at 10:06 am

    मनीय आदित्य जी आप से निवेदन है कि थोडा महाराष्ट्र से निकल कर दूसरे प्रदेश मे सहयोग करे इससे और भी जगह पार्टी की शाक बढेगी और हम जैसे युवा शिवसेना मे मजबूत होगे । जय श्री राम जय महाराष्ट्र

Leave a comment

0.0/5