Skip to content Skip to footer

५०-६० वेळा मंत्रालयात जाऊन न झालेलं काम आदित्य ठाकरेंनी जागेवर केलं

सरकारी अधिकारीच म्हणतात आदित्य ठाकरेंकडे जा, ते नक्की काम करतील..

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा आज संपला. सकाळी नगर येथील माउली सभागृहात त्यांचा “आदित्य संवाद” हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात एका तरुणीने महाविद्यालयातील अडचणी मांडल्या असता कार्यक्रम संपताच आदित्य ठाकरे महाविद्यालयात धडकले. त्यांनी परिसराची पाहणी करून कार्यवाही कार्याचे आदेश संबंधितांना दिले. या आधीच्या कार्यक्रमातही एका शेतकऱ्याने आदित्य यांचं भाषण सुरु असताना “आम्हाला रुग्णालय हवं” अशी मागणी केली होती. यावर आदित्य ठाकरेंनी “आठ दिवसात काम सुरु करतो” असं उत्तर देऊन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंना कार्यवाहीचे आदेश दिले होते.

आदित्य ठाकरेंच्या या कार्यशैलीची आणि कार्यतत्परतेची शासकीय अधिकाऱ्यांनाही भुरळ पडली असावी असं आता समोर आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या आजच्या कार्यक्रमात एक आजीबाई पेन्शन संबंधित समस्या मांडण्यासाठी आल्या होत्या. त्यांचीही समस्या आदित्य ठाकरेंनी सोडवली. यावर त्या आजींनी “मला शासकीय अधिकाऱ्यांनीच सांगितलं होतं की तुम्ही आदित्यसाहेब ठाकरेंकडे जा, तुमचा प्रश्न ते नक्की सोडवतील” असं सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान अनेक समस्या ऐकून त्या चुटकीसरशी सोडवत आहेत. याचा जनतेवर चांगलाच प्रभाव पडत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक आपल्या समस्या आणि निवेदनं आदित्य ठाकरेंकडे देऊन आपले प्रश्न सोडवून घेत आहेत. त्यातच सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही सरकारी पदावरील नेत्याकडे अथवा मंत्र्याकडे न पाठवता या आजींना “आदित्यसाहेब ठाकरेंकडे जा, तुमचं काम होईल” असं सांगितल्याने सरकारी अधिकाऱ्यांनाही आदित्य ठाकरेच काम करतील असा विश्वास वाटत असल्याचं दिसून आलं आहे.

५०-६० वेळा मंत्रालयात जाऊन न झालेलं काम आदित्य ठाकरेंनी जागेवर केलं

दरम्यान या आजीबाईंनी आपली समस्या मांडताना “मी तब्बल ५०-६० वेळा मंत्रालयात जाऊन आले, विनोद तावडेंना भेटले तरी माझं काम झालं नाही. मला मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नाही. मी पात्र असून मला पेन्शन मिळत नाही.” असं स्पष्टपणे सांगितलं. आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांनीच आदित्य ठाकरेच हे काम करतील असं सांगितल्याचही त्या म्हणाल्या. याचा अर्थ जे काम मंत्रालयात ५०-६० वेळा जाऊन झालं नाही ते आदित्य ठाकरेंनी मंत्रालयात न जात काही मिनिटात केलं.

तुम्ही मला मुलासारखे, आजीबाईंचा आदित्य ठाकरेंना आशीर्वाद

4 Comments

 • सुनिल बबनराव थोरवे
  Posted July 22, 2019 at 10:27 pm

  जय महाराष्ट्र साहेब खुप खुप छान

 • Omprakash sambhjirao Pedge
  Posted July 23, 2019 at 8:07 am

  Very nice work Dada

 • Slot games
  Posted August 31, 2019 at 10:22 pm

  Asking questions are actually pleasant thing if you are not understanding something
  entirely, except this piece of writing presents pleasant understanding yet.

 • Refugia
  Posted January 16, 2020 at 2:58 am

  Thanks for publishing this awesome article. I’m a long time reader but I’ve
  never been compelled to leave a comment. I subscribed to your blog and shared this on my Twitter.

  Thanks again for a great post! http://www.osteopathy-halifax.ca

Leave a comment

0.0/5