Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाड्यात करून दाखवलं..!

 

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत बीडच्या जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी फक्त सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी अल्पावधीत केलेल्या विकासकामांमुळे आणि आणलेल्या निधीमुळे विरोधकांची तोंड बंद झाली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळालं. याचा फायदा करून घेत जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाड्यातील अनेक कामं मार्गी लावली आहेत. सर्वात महत्वाचा असा दुष्काळ प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्ण योजना मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिलं आणि याचा पुरेपूर फायदा घेत क्षीरसागर यांनी केलेली कामं तसेच आणलेल्या योजनांचा आढावा थोडक्यात:

-बीडमधील रस्त्यांसाठी ८० कोटींचा निधी आणला आणि त्यापैकी ५ कोटींचा रस्ता केवळ महिन्याभरात पूर्ण केला.

-बीड जिल्ह्याचा वॉटरग्रीड प्रकल्पात समावेश. दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाची योजना. मराठवाड्यातील सर्वच जिल्हे याद्वारे जोडण्यात येत आहेत. ११ प्रकल्पांचा यात समावेश असेल.

-आंध्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते मराठवाडा आणि खान्देशात वळवण्यात येईल. मराठवाड्यातील दुष्काळावर दीर्घकालीन उपाय म्हणून ही योजना आहे.

-बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी मंदिर परिसरात तयार केलेल्या रस्त्याचे लोकार्पण आणि वृक्षारोपण पार पडले आहे.

-वैतारणामधील पाणी ५० कोटी रुपयांत सिंदफणा, गोदावरी आणि जायकवाडीच्या खोऱ्यात आणले जाऊ शकते. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान इत्यादींचा अभ्यास क्षीरसागर करत आहेत. याद्वारे १२ टीएमसी पाणी आणलं जाईल.

-बीड जिल्ह्यातील तब्बल ३०००० सोयाबीन शेतकऱ्यांना पीक विमा यादीतून वगळण्यात आलं आहे मात्र क्षीरसागर विमा कंपन्यांशी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

-शहराच्या विकासाठी ३५० कोटींचा निधी जयदत्त क्षीरसागर यांनी आणला आहे.

-शहरातील ऐतिहासिक वारसा आणि वस्तूंच्या विकास करून त्यांचे जतन करण्यासाठी क्षीरसागर प्रयत्नशील आहेत.

-दीपमाळ येथील ध्यान मंदिरास १० लाखांचा निधी दिला.

-बीडमधील रस्त्यांचे आराखडे तयार असून लवकरच नवे रस्ते बनवण्यात येतील.

-बीडकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी २३ बागा आणि ओपन जिम ही मुंबईत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी राबवलेली संकल्पना क्षीरसागर बीडमध्ये राबवणार आहेत.

शिवसेना प्रवेशानंतर काही काळातच जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळालं. याचा पुरेपूर फायदा घेत क्षीरसागर यांनी बीडमध्ये विकासगंगा आणली असून केवळ एका महिन्यातच वरील कामं करून दाखवली आहेत.

2 Comments

  • राजू रामभाऊ शिंदे
    Posted July 31, 2019 at 7:04 am

    योगी निर्णय झालेला आहे

Leave a comment

0.0/5