Skip to content Skip to footer

शिरूर-हवेली राष्ट्रवादीतील २५ नेत्यांचा आढळरावांच्या नेतृत्वात उद्या शिवसेना प्रवेश

 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौकार मारण्यात अपयश आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपला प्रभाव चांगलाच जिव्हारी लागला. शिवसेनेने त्यांना संघटनेतील उपनेते पद देऊन त्यांच्या सन्मान केला. यानंतर शिरूर मतदारसंघात आढळराव सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणलं. त्यांना आढळरावांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं. अमोल कोल्हेंच्या संभाजी मालिकेमुळे असलेल्या प्रतिमेचा फायदा त्यांना झाला. परिणामी शिवाजीराव आढळरावांचा पराभव झाला. यामुळे राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी आढळरावांनी आता कंबर कसली आहे. शिवाजी आढळराव पाटील आणि नूतन जिल्हाप्रमुख माउली कटके यांच्या नेतृत्वात २ ऑगस्ट रोजी शिरूर-हवेली राष्ट्रवादीतील तब्बल २५ नेत्यांचा शिवसेना प्रवेश मातोश्री येथे होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील सलग तीनवेळा खासदार म्हणून विजयी झाले होते. यंदा मात्र त्यांना राष्ट्रवादीने पराभवाचा धक्का दिला. यामुळे पेटून उठलेल्या आढळरावांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. शिरूर-हवेली, आंबेगाव, जुन्नर अशा मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीचा पराभव करण्याचा निश्चय आढळरावांनी केला आहे. त्यानुसार या मतदारसंघात भगवा फडकवण्याचा आढळराव सक्रिय झाले आहेत. शिरूर-हवेली विधानसभा मतदातरसंघातील राष्ट्रवादीच्या अनेक गण आणि गटातील नेत्यांना शिवसेनेत आणण्यात नूतन जिल्हाप्रमुख माउली कटके यांना यश मिळालं आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव करणार, आढळरावांचा निर्धार

Leave a comment

0.0/5