Skip to content Skip to footer

भाजपचाच सर्व्हे सांगतो युती तोडली तरी शिवसेनेचे १०० आमदार विजयी होणार!

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकीत युती करतानाच विधानसभेसाठी ती कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेत भाजपला ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. यानंतर पुन्हा एकदा युतीचं नक्की काय होणार याच्या चर्चा प्रसारमाध्यमात रंगल्या. शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मात्र “आमचं ठरलंय” म्हणत युतीत जागावाटप आणि सत्तावाटपाचा “समसमान” फॉर्म्युला ठरला असून तो योग्यवेळी जाहीर केला जाईल असं म्हटलं आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारीही सुरु केली आहे. शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा आता दुसऱ्या टप्प्यात आहे. मुख्यमंत्र्यांनीही कालपासून महाजानदेश यात्रा सुरु केली आहे. राज्यात शिवसेना-भाजपाला स्पर्धकच उरलेला नसल्याने शिवसेना आणि भाजपने सर्वाधिक आमदार निवडून आणत मुख्यमंत्रीपदावर दावा मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे.

या पार्श्वभूमीवर जनमत जाणून घेण्यासाठी भाजपनं एक अंतर्गत सर्व्हे केला होता. या सर्व्हेतील आकडेवारी आता समोर आली आहे. शिवसेना-भाजप युती तुटली तर भाजपला १५०-१६० जागा मिळू शकतात आणि शिवसेनेला ९०-१०० जागांवर विजय मिळू शकतो. म्हणजेच भाजपच्या २५-३५ तर शिवसेनेच्या ३०-४० जागा वाढू शकतात. युती तोडल्यानंतरही शिवसेनेच्या जागा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचं स्वतःच्याच सर्व्हेत समोर आल्याने भाजप युती तोडून रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्याचं समजतं. स्वबळावर लढल्यास अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला १५० जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु ऐनवेळी होणारी पक्षांतरे आणि बदलणारी समीकरणे यामुळे काही जागांवर फटका बसला तर भाजपचा आकडा १३० वर येऊ शकतो. स्वबळावर लढून बहुमत न मिळाल्यास शिवसेनेचा पाठिंबा घेणं भाजपाला अनिवार्य होईल. त्यावेळी शिवसेनेचं संख्याबळ असल्याने सध्यापेक्षा जास्त सत्तेचा वाटा द्यावा लागेल. युती राहिली तरी शिवसेनेला सत्तेत निम्मा वाटा द्यावा लागणारच आहे.

शिवसेनेशिवाय सत्तास्थापना अशक्य झाली तर भाजपला पुन्हा शिवसेनेचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. त्यापेक्षा युतीतच लढून युतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्याचा भाजपचा विचार असल्याचं समजतं.

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!

Leave a comment

0.0/5