Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, शेतकऱ्यांचे दत्ता चरणी साकडे

शेतकरी म्हणतात “माझा शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा आणि त्यांनी कर्जमाफी करावी”

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज हदगाव येथे अनोखा शेतकरी संवाद कार्यक्रम घेतला. यावेळी बळीराजासमोर चटईवर बसून आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले. यावेळी बळीराजाने आपलं मन आदित्य ठाकरेंसमोर मोकळं केलं. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हा शिवसेनेचा नारा होता पण आपलं सरकार आलं नाही, आता एकच ईच्छा आहे.. माझा शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा आणि दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा” असं मनोगत एका ज्येष्ठ शेतकऱ्याने यावेळी व्यक्त केलं. यावर आदित्य ठाकरेंनी “शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच दुसऱ्या नाही तर पहिल्याच दिवशी आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार” असा शब्द यावेळी बळीराजाला दिला.

दुसऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या व्यथा मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं मत व्यक्त केलं. यावर आदित्य ठाकरे यांनी “मी कोणत्याही पदासाठी नाही तर आत्ता जसं काम करतोय तसं कायम करेन” असं उत्तर दिलं. यावर त्या शेतकऱ्याने बोलताना “तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल” असं म्हणत आशीर्वाद दिले.

यानंतर आणखी एका शेतकऱ्याने आपलं मत व्यक्त करतानाच “तुम्ही दत्त महाराजांच्या पावन भूमीत आलात. तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे” असं म्हटलं आणि जमलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. दरम्यान या शेतकरी संवादास शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आजवर स्टेजवरून भाषण झाली पण आज एक नेता जमिनीवर बसून आपल्याशी संवाद साधतोय याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर लाभ घेत शेतीविषयक समस्या मांडल्या. यात सरसकट कर्जमाफी, पीक विमा, लोडशेडिंग, हमीभाव, खत आणि बियाणांच्या किंमती इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. हे प्रश्न मांडतानाच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा बळीराजाने व्यक्त केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात दुष्काळ हा भीषण प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, पीक विमा, हमीभाव इत्यादी शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत. याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने सत्तेत राहून सरकारला वारंवार जाब विचारला आहे. एवढंच नव्हे तर अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत. सत्तेत राहून आंदोलन केल्यामुळे शिवसेनेवर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती.

या टीकेला न जुमानता शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारात राहिली. शेतकऱ्यांना शिवसेनेची ही भूमिका शंभर टक्के पटली असल्याचं आजच्या या शेतकरी आदित्य संवाद कार्यक्रमात दिसून आलं. शिवसेनेचं सरकार यावं, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा आशावाद व्यक्त करत शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंना आशीर्वाद दिला आहे.

आदित्य ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना केवळ तोंडी आश्वासन न देता शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि मतं नोंदवून घेत संबंधित मंत्र्यांना तात्काळ जे शक्य असेल तर ताबडतोब करण्याचे आदेश दिले आहेत. नुसता संवाद साधून न थांबता शक्य तेवढे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न तात्काळ सुरु केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळल्याने आदित्य ठाकरे यांच्या या शेतकरी आदित्य संवाद संकल्पनेला मोठं यश मिळालं असच म्हणावं लागेल.

रडत रडत एका महिलेने आदित्य ठाकरेंचा ताफा थांबवला आणि..नक्की वाचा:

Leave a comment

0.0/5