Skip to content Skip to footer

शिरूर-हवेली राष्ट्रवादीच्या ३९ नेत्यांनी केला मातोश्रीवर शिवसेना प्रवेश

शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील आणि पुणे जिल्हाप्रमुख माउली कटके यांच्या नेतृत्वात शिरूर-हवेली राष्ट्रवादीच्या ३९ नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून मातोश्रीवर हा प्रवेश पार पडला. यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचीही यावेळी उपस्थिती होती. हा पक्षप्रवेश स्थानिक राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जातो. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कंबर कसली आहे. यातच या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे तर शिवसेनेचं बळ वाढलं आहे.

पूर्व हवेलीतील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत काळभोर, ज्येष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक आणि पदाधिकारी इत्यादी ३९ नेत्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे लोणी-काळभोर ग्रामपंचायत तसेच अनेक सहकारी संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा होणार असून राष्ट्रवादीची स्थिती बिकट झाली आहे.

दरम्यान शिरूर-हवेली राष्ट्रवादीचे २५ पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी प्राथमिक माहिती होती मात्र शुक्रवारी तब्बल ३९ नेत्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादीला अनपेक्षित धक्का बसला आहे.

शिरूर-हवेली राष्ट्रवादीतील २५ नेत्यांचा आढळरावांच्या नेतृत्वात उद्या शिवसेना प्रवेश

Leave a comment

0.0/5