Skip to content Skip to footer

बत्तीसशिराळा येथील पारंपारिक नागपूजेला परवानगी देण्याची खा. धैर्यशील माने यांची मागणी.

बत्तीस शिराळा येथे नागरीकांना नागपुजा करण्यासाठी पुर्वी प्रमाणे परवानगी दयावी अशी मागणी खासदार धैर्यशील दादांनी संसदेमध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली. यावेळी जावडेकर यांनी या विषयावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील बत्तीस शिराळा, सांगली येथील प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या नागपंचमी उत्सवावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९ नुसार या परंपरेवर बंदी घालण्यात आली आहे. या कायदया अतंर्गत कलम ११ व १२ मध्ये शैक्षणिक तथा वैज्ञानिक अपवाद ग्राहय मानले जात आहे.

 

शरद पवार हृदयात आहेत असे म्हणणाऱ्याचे हृदय तपासा – शरद पवार

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. या भागामध्ये ९० टक्के लोक शेतकरी आहेत. सदर ठिकाणी कित्येक वर्षापासून नागाची पुजा केली जाते. ही उल्लेखनीय बाब लक्षात घेऊन सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी कायदयाच्या चौकटीत राहून नागपुजा करण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, कलम ११ व १२ तथा राज्य घटना कलम २५ व २६ नुसार शिराळा ग्रामस्थांना सजीव नागपुजेचा अधिकार दयावा अशी मागणी दादांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जावडेकरांनी दिले.

Leave a comment

0.0/5