Skip to content Skip to footer

आदित्य इम्पॅक्ट:२४ तासात बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील घाणीचं साम्राज्य हटण्यास सुरुवात

आदित्य इम्पॅक्ट:२४ तासात बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील घाणीचं साम्राज्य हटण्यास सुरुवात

काल बीड येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा महिला विशेष आदित्य संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान एका चिमुकलीने मोठ्या धाडसाने बीड जिल्हा रुग्णायालयाच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न मंडला होता. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मी आजच याबाबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो, तुमचं जिल्हा रुग्णालय उद्यापर्यंत साफ होईल” असं म्हटलं होतं. या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील घाणीचं साम्राज्य हटण्यास सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांची कार्यतत्परता दिसून आली आहे. बीड जिल्ह्यातभ सध्या आदित्य ठाकरे हाच विषय चर्चेचा आणि कौतुकाचा ठरला आहे. समस्या मांडताच केवळ २४ तासात ऍक्शन घेतल्याने नेता असावा तर असा अशी प्रतिक्रिया बीडमधील जनतेने व्यक्त केली आहे.

बीड जिल्हा

याबाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची मलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यामुळे रुग्णालय परिसरात घाणीचं साम्राज्यच निर्माण झालं होतं. रुग्णालय परिसरातच प्रचंड घाण असल्याने अर्थातच याचा रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. काल हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे येताच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून त्यांनी पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. यानंतर तात्काळ युवासेनेचे विपुल पिंगळे, शिवराज बांगर, जिल्हाप्रमुख सागर बहिर हे रीतसर निवेदन घेऊन सिव्हिल सर्जन आणि बांधकाम अधिकाऱ्यांकडे दाखल झाले. सदर तक्रार समजल्यापासून २४ तासांचाही अवधी न लावता कामाला सुरुवात झाली. शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी सविस्तर चर्चा करून रुग्णालय परिसर स्वच्छतेला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे.

आठ दिवसात मोफत बस देण्याचा शब्द आदित्य ठाकरेंनी चारच दिवसात केला खरा

Leave a comment

0.0/5