Skip to content Skip to footer

कोल्हापूर बचाव कार्यसाठी आर्मी, नेव्ही जिल्ह्यात दाखल

राज्यात गेले दोन दिवस पावसाने कहर केला आहे. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

 

तर सांगलीत देखील अशीचं आपत्ती आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीला पूर आला आहे. नदी काठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात पूर आला आहे. या पुरात हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच लष्करी जवान देखील दाखल झाले आहेत.

Leave a comment

0.0/5