Skip to content Skip to footer

शिवस्वराज्य यात्रेत सहभागी नेत्यानेच काढले यात्रेचे वाभाडे,कोल्हेंच्या भाषणाची चिरफाड

 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्टपासून सुरु झाली आहे.यात्रा सुरु होऊन दोन दिवस जातात-न जातात तोवर या यात्रेत सहभागी नेत्यानेच अमोल कोल्हेंच्या भाषणाची चिरफाड करत शिवस्वराज्य यात्रेचे वाभाडे काढले आहेत. संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस हे शिवस्वराज्य यात्रेच्या स्टेजवर उपस्थित होते. एवढंच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. त्यांनीच शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणातील मुद्द्यांची जाहीर चिरफाड केली आहे. यामुळे राष्टवादीत एकच खळबळ उडाली आहे. दुपारी अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या नेत्यानेच असे प्रश्न विचारल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत भाषण करत असतात. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा शिवनेरीपासून सुरु केली. हेच धागे पकडून टिळक भोस यांनी अजित पवारांना जळजळीत सवाल विचारले आहेत. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश शिवछत्रपती सैन्याला देतात, मग गोर-गरिबांना त्यांच्या घामाचं दाम न देता तुम्ही शिवस्वराज्य यात्रा कशी काढली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीला शेतकऱ्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही असं भोस यांनी म्हटलं आहे.

टिळक भोस यांनी फेसबुक पोस्टद्वारे अजित पवारांना विचारलेले जळजळीत जाहीर सवाल आणि त्यांची पोस्ट खालीलप्रमाणे:

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश शिव छत्रपती सैन्याला देतात –

#अजित दादा पवार यांना आमचा सवाल..??

याच शिवछत्रपतींच्या जन्मभूमीतून किल्ले शिवनेरी वरून तुम्ही ही शिव स्वराज्य यात्रा सुरू केलीत मग

श्रीगोंदा तालुक्यात मात्र शेतकर्यांच्या उसाचे पैशे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पाटील चेरमन कुकडी सहकारी साखर कारखाना हे देत नाहीत
मग ही यात्रा शिव स्वराज्य यात्रा कशी…??

रयतेचे हित तुम्हाला साधायचे आहे का ?
गोरगरीब-कष्टकरी-श्रमकरी-कामगार -वाहतुकदार यांना घामाचे दाम मिळऊन द्या नाहीतर
शेतकऱ्यांच्या तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही

दादा घामाचे दाम न देणाऱ्या आमदार राहुल जगताप यांवर कारवाई करून ;
शेतकरी-कामगार-वाहतुकदार यांचे पैशे मिळवून देणार का ?

हा रोकडा सवाल विचारताना..!

शिवस्वराज्य यात्रा तुमची
#सवाल आमचा
#कारखानदारांना पाठीशी घालून सत्ता देणारे अजित दादा पवार
आमच्या घामाचे दाम मिळून देणार का ?

#टिळक भोस
जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
अहमदनगर
श्रीगोंदा -नगर विधान सभा

#शिवस्वराज्य यात्रा
#Drअमोलकोल्हे
#अजितपवार

2 Comments

  • टिळक भोस
    Posted August 8, 2019 at 5:30 pm

    सम्पर्क करा

  • गदादे राजेंद्रकुमार शंकरराव
    Posted August 13, 2019 at 2:19 pm

    रोजच्या कमाई तून फक्त एकच रूपया देशासाठी बाजूला ठेवायचे वर्षाचे 365/रूपये होतील. नैसर्गिक आपत्ती च्या वेळी कामी येतील. अशाप्रकारे प्रत्येक नागरीकांनी सैनिकांसाठी रोजच्या कमाई तून फक्त एकच रूपया जमा केल्यास वर्षाचे 365/प्रमाणे भरपूर रक्कम देशासाठी जमा होईल.

Leave a comment

0.0/5