कोल्हापुरातील पुरग्रस्थ भागाची मंत्री एकनाथ शिंदेंनी केली पाहणी….

कोल्हापुरातील भीषण पूर परिस्थितीमुळे तेथील जणजीवन पूर्णपणे विस्कळित झालेले आहे. मागील सात-आठ दिवसा पासून पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यातील अनेक गावे ही पुराच्या पाण्यात बुडालेली आहे. या पुरग्रस्थ परिस्थितीचा दौरा मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता .

 

 

कोल्हापूर जिल्यातील करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावातील लोकांना मंत्री शिंदे यांनी भेट दिली. तसेच प्रशासनाला लवकरात लवकर त्यांना सुरक्षित ठिकाणी हवण्याचे आदेश सुद्धा दिले. यासमयी ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाकरिता चाऱ्याची मागणी केली, याप्रसंगी शेतकरी बांधवांच्या पशुधनाकरिता उद्यापर्यंत चाऱ्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली तसेच आंबेवाडीतील समस्त गावकऱ्यांकरिता पिण्याचे पाणी, जेवण, वैद्यकीय सेवा व औषधांचा पुरवठ्याबाबत व्यवस्थेची पाहणी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here