पुरातील मृतांचा आकडा ४३ वर……..

पुरातील | The death toll for the old one is 8

सलग सात-आठ दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरचा कहर दिसून आला. गेल्या आठवडाभर पाणी ओसरण्याचे नाव घेत नव्हते. राज्यात पुराचे आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात परिस्थिती अधिक वाईट आहे.

येथे चारही ठिकाणी केवळ पाणी दिसून येत आहे. एनडीआरएफ, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराचे सैनिक लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच आता मदत कार्याला वेग आला आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे गेले आठ दिवस ठप्प असलेली वाहतूक सुरु झाली आहे.

या पुरातून वाहून गेलेले तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. ५८४ गावातील ४ लाख ७४ हजार २२६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. विस्थापित झालेल्या लोकांसाठी ५९६ तात्पुरते निवारा शिबिर स्थापन करण्यात आले आहेत.

देशात सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रात नोंदविण्यात आला आहे. १ जूनपासून १२ ऑगस्टपर्यंतच्या नोंदीनुसार, मध्य महाराष्ट्रात ८५३.७ मिलीमीटर म्हणजे ७४ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला असून, येथील पावसाची सर्वसाधारण नोंद ४९० मिलीमीटर एवढी आहे. कोल्हापूर आणि सांगलीत वर्षभराचा पाऊस तीन दिवसात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुराचे मोठे संकट उभे राहिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here