मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भावी मुख्यमंत्र्यांचा झंझावात,कार्यक्रमाला तुफान गर्दी

गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भावी मुख्यमंत्र्यांचा झंझावात,कार्यक्रमाला तुफान गर्दी

शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज नागपूर येथे पोहोचले. नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. शिवाय भाजपचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नागपूरचे आहेत. संघ आणि भाजपचा किल्ला असलेल्या या नागपुरात शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला तुफान गर्दी झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. नागपुरात जन आशीर्वाद यात्रा दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. आदित्य ठाकरेंची एक झलक पाहण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती. आदित्य यांची छबी आपल्या मोबाईल आणि कॅमेरात टिपण्यासाठी उपस्थितांनी लगबग केली.

नागपुरातील प्रियदर्शनी महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांचा “आदित्य संवाद” कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास तब्बल ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. यावेळी तब्बल १८०० प्रश्न लिखित स्वरूपात जमा झाले होते. आदित्य ठाकरे यांनी यातील काही प्रश्नांना तसेच कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. उर्वरित प्रश्न सोबत घेऊन जाणार असून त्यांची उत्तरेही दिली जातील असं ते म्हणाले. थेट आदित्य ठाकरेंशी संवाद साधता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. कार्यक्रम १ वाजता असला तरी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळी आदित्य यांचं आगमन होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी काही तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली होती. गळ्यात कवड्यांची माळ, अंगावर वाघाच्या कातड्यासारखा पोशाख करून आलेले हे तरुण सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. आदित्य ठाकरेंनीही या तरुणांशी हस्तांदोलन करत संवाद साधला. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भावी मुख्यमंत्र्यांचा झंझावात यानिमित्ताने पाहायला मिळाला.

पूरग्रस्तांच्या भेटीनंतरच आदित्य ठाकरे करणार जन आशीर्वाद दौरा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here