शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अतिशय सज्जन माणूस-दिलीप माने

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अतिशय सज्जन माणूस-दिलीप माने

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अतिशय सज्जन माणूस-दिलीप माने

दक्षिण सोलापूरचे माजी काँग्रेस आमदार दिलीप माने यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यानंतर झालेल्या सोलापूर जिल्हा शिवसेना निर्धार मेळाव्यात बोलताना दिलीप माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे अतिशय सज्जन माणूस असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले नेते आणि शिवसेनेतील नेते या मेळाव्याला उपस्थित होते. शिवाय शेकडो शिवसैनिकांचीही या मेळाव्याला हजेरी होती. राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, आमदार दिलीप सोपल,भाजपचे नागनाथ क्षीरसागर आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्व नेत्यांची शिवसेनेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच हजेरी या मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली. यावेळी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या या नेत्यांनी शिवसैनिकांना आम्हाला सांभाळून घ्या अशी साद घातली.

या मेळाव्यात बोलताना दिलीप माने यांनी मीडिया दाखवते त्या बातम्या आणि वस्तुस्थिती यात प्रचंड फरक असल्याचं म्हटलं. यामुळेच मी टीव्ही पाहणं सोडून दिलं आणि काही दिवसांनी वर्तमानपत्रं वाचन सुद्धा सोडून देईल असं ते पुढे म्हणाले. याचं उदाहरण देताना माने यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. उद्धव साहेबांचा स्वभाव मला माहिती नव्हता. मी तानाजी सावंत यांच्यासोबत त्यांची भेट घेतली.यावेळी मीडिया दाखवते त्या बातम्या आणि वस्तुस्थिती यात खूप मोठा फरक दिसून आल्याचं ते म्हणाले. “उद्धव ठाकरे हा अतिशय सज्जन माणूस आहे, हा माणूस राजकारणातला वाटत नाही.” असं म्हणत माने यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

दिलीप मानेंच्या प्रवेशामुळे सोलापूर मध्य मतदारसंघात महेश कोठे यांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र मी अजून कोणत्याच जागेची मागणी केली नाही. मग कोठेंच्या अडचणीत वाढ कशी काय झाली? असं म्हणत दिलीप माने यांनी शहर मध्य मतदारसंघावर दावा केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

भास्कर जाधव यांच्यासोबत शंभराहून अधिक नेते शिवसेनेत प्रवेश करणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here