Skip to content Skip to footer

कोण प्रीती मेनन? आदित्य ठाकरेंचा पलटवार..

कोण प्रीती मेनन? आदित्य ठाकरेंचा पलटवार..

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी त्यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आरेमध्ये मेट्रो कारशेड करण्यास विरोध केला होता. आरेच्या जंगलात अनेक दुर्मिळ प्रजातींचे वन्यजीव राहतात. आरे जंगल उध्वस्त केल्यास ते बेघर होतील. शिवाय मिठी नदीला येणार पूर नियंत्रित करण्यास आरेच्या जंगलाची मदत होते. आरे जंगल नष्ट झाल्यास पुराचं पाणी थेट मुंबईत घुसेल. आरे जंगल हे मुंबईच फुफ्फुस आहे. मुंबईकरांना शुद्ध हवा पुरवण्याचं काम येथील वृक्ष करतात. त्यामुळे आरे कारशेड मधील वृक्ष कापून तिथे मेट्रो कारशेड करू नये अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. त्यांच्यासोबत उपस्थित वन्यजीव संशोधक आणि आरे विषयातील अभ्यासक असलेल्या तज्ञ लोकांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मीडियासमोर जाहीर सादरीकरण करत आरे वाचवण्याची मागणी केली होती. आम्हाला मेट्रो हवी आहे पण आरे जंगल उध्वस्त करून मेट्रो कारशेड उभारण्याला आमचा विरोध आहे अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली होती.

यावर प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेचं आरे कारशेडला समर्थन आहे. आदित्य ठाकरे हे पप्पू ठाकरे आहेत. त्यांना आपण पप्पू ठाकरे म्हटलं पाहिजे असं प्रीती मेनन यांनी म्हटलं होतं. यावरून पत्रकारांनी कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी कोण प्रीती मेनन? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यांनी काय वक्तव्य केलं आहे हे मला माहिती नाही असं ते म्हणाले. प्रीती मेनन यांनी टीका करूनदेखील आपण त्यांना मोजत नाही असं आदित्य ठाकरेंनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. आपल्यावर झालेल्या टीकेला थेट उत्तर न देताच आदित्य ठाकरेंनी प्रीती मेनन यांच्यावर पलटवार केला आहे. यापूर्वीही आदित्य यांच्यावर राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे, अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांनी खालच्या पाटलाईवरील टीका केली होती. मात्र आदित्य ठाकरेंनी कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर न देता आपण विरोधकांना खिजगणतीत सुद्धा पकडत नाही हे दाखवून दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राणेंच्या स्वाभिमानला खिंडार!

Leave a comment

0.0/5