बाळासाहेब ठाकरे कलादालनाला विरोध,शिवसेनेने आयुक्त कार्यालय फोडलं

बाळासाहेब ठाकरे कलादालनला विरोध,शिवसेनेने आयुक्त कार्यालय फोडलं

बाळासाहेब ठाकरे कलादालनला विरोध,शिवसेनेने आयुक्त कार्यालय फोडलं

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाला विरोध करणाऱ्या आयुक्तांचं कार्यालय शिवसेनेने फोडलं आहे. पालिकेच्या अजेंड्यावरून बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा विषय डावलण्यात आल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसेना नगरसेवकांनी उग्र रूप धारण करत महापालिकेत घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेकडून आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रात युती झाली तरी मीरा-भाईंदरमध्ये होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत हा प्रकार घडल्याने शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

शिवसैनिकांची अनोखी निष्ठा:तुफान पावसात सभेला गर्दी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here