नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश-मनसेला हाबाडा

नितीन नांदगावकर

 

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला सर्वात मोठा हादरा बसला आहे. नितीन नांदगावकर यांची सोशल मीडिया तसेच युवा वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या आक्रमक भूमिका आणि प्रश्न उपस्थित करण्याच्या शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात.

काल मध्यरात्री नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यापुढे शिवसेनेच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं यावेळी नांदगावकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते सध्याचे सर्वात सक्रिय नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनीच शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने मनसे समर्थकांची झोप उडाली आहे.

होय..शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो..कसा ते वाचा:

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here