सुनील शेळके यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी,कार्यकर्त्यांचा समुद्र लोटला

सुनील शेळके यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी,कार्यकर्त्यांचा समुद्र लोटला

भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या सुनील शेळके यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी लोटली होती. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यामुळे त्यांची अर्ज भरण्याची रॅली ही विजयी मिरवणूक ठरली असल्याचं बोललं जात आहे.

सुनील शेळके यांच्या रॅलीला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे जनतेचा समुद्र लोटल्याच भासत होतं. हजारो कार्यकर्ते जमल्याने परिसरात मोबाईल नेटवर्क जाम झालं होतं. तर परिसरातील गावच्या गावं आणि वस्त्या ओस पडल्या होत्या. अर्ज भरण्याचा मार्ग वगळता इतर सर्व रस्ते ओस पडले होते. यानिमित्ताने शेळके यांची ताकद दिसून आली आहे.

शेळके यांच्या रॅलीत ६१ लेझिम संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यामुळे परिसर दणाणून गेला. सुनील शेळके यांची उमेदवारी नाकारणाऱ्या भाजपला ही निवडणूक चांगलीच जड जाणार असल्याचं यामुळे दिसून आलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here